गोध्रा हत्याकांड : तीन आरोपींची निर्दोष मुक्तता तर दोन जणांना जन्मठेप  

गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली – गोध्रा हत्याकांड प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात अली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोध्रा हत्याकांड प्रकरणी ३१ जणांना शिक्षा सुनावण्यात अली होती. यामधील ११ जणांना फाशीच तर २० आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात अली होती. मात्र मागील वर्षी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ११ आरोपींची फाशी रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर आज तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात अली असून दोन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

काय आहे गोध्रा हत्याकांड प्रकरण ?

गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या ५९ कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. साबरमती ट्रेनच्या एस-6 या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने 31 जणांना दोषी ठरवलं होतं, तर 63 जणांना निर्दोष मुक्त केलं. या घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारने नानावटी आयोगाची स्थापना केली. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 बोगीत लागलेली आग ही एक घटना नव्हती, तर तो एक कट होता, असे या आयोगाने म्हटलं होतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)