गोदावरीने नदीने घेतला 14 जणांचा बळी

प्रशासनाच्या सूचनांकडेनागरिकांचे दुर्लक्ष

कोपरगाव – दक्षिण काशी म्हणून अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीने या वर्षात जुलै महिन्यात पुराच्या पाण्यामुळे विविध घटनांत 14 जणांचा बळी घेतला. तालुक्‍यासह नाशिक जिल्हयामधील धरण परिसर व इतर ठिकाणी झालेल्या पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीत या घटना घडल्या. प्रशासनाने दिलेल्या सतर्कतेच्या सूचनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने या दुर्घटना घडल्या.

नदीतील पुराच्या पाण्यात वाहून आलेले 14 स्त्री -पुरूषांचे मृतदेह मिळून आले. त्यातील काहींनी स्वतः नदीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली, तर काही पुराचे पाणी पाहण्यासाठी व त्यात पोहण्यासाठी गेल्यानेमृत पावले. काहींचा नदीच्या पुलावरील खड्ड्यात गाडींचा अपघात होऊन पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. अशा विविध प्रकारेहे 14 बळी गेले.

या सर्वांचे मृतदेह कोपरगाव तालुक्‍यातील विविध ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रात मिळून आले. शासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळयात नागरीकांना पुराच्या पाण्यापासून सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या जातात. वेळोवेळी पाटबंधारे विभाग नदीपात्राच्या परिसरावर नजर ठेवून असतो. तरी अतिउत्साही तरूण पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी जावून आपला जीव धोक्‍यात घालतात. गोदावरीच्या पाण्याला पुराच्यावेळी गती असते. यावर्षी तीन वेळेस नदीतून 50, हजार क्‍युसेस पेक्षा ज्यास्त पाण्याच्या विसर्ग झाला. नांदुर मधमेश्वर बंधायांतून हे पाणी जायकवाडी धरण्याच्या दिशेने झेपावत होते. अशा वेळेस गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा शासनाच्यावतीने दिले गेले तरीही 14 जणांना जलसमाधी मिळाली.
नाशिक , औरंगाबाद जिल्हयातील नदीकाठच्या परिसरातील नागरीकांना जलसमधी मिळालेली माहिती वेगळी असणार आहे. दरवर्षी अशा प्रकारे घटना घडतात. याचा नागरीक व तरूणांनी गांभिर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)