मंचर-श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त कळंब (ता. आंबेगाव) येथे हभप गोदावरीताई मुंडे (परभणी) यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 16) पार पडला. “विठु माझा लेकुरवाळा, झाली सुप्रभात विठू नामाच्या गजराने, झाला विठुनामाचा गजर, माय बाप माझे दैवत, धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दोर’ या भजनांच्या ओळीने प्रेक्षकांची मने जिंकली.
भजन कार्यक्रमासाठी हभप सुरेखाताई शिंदे यांची सुरेख साथ लाभली. यावेळी सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, माजी संचालक यशवंत कानडे, गंगाधर कानडे, तुकाराम कानडे, बाबुराव कानडे, किसनराव कहडणे, सेवानिवृत्त अधिकारी सखाराम भालेराव, डी. आर. भालेराव, सूर्यकांत थोरात, रामचंद्र वाव्हळ, माजी सरपंच बाळशिराम भालेराव, गंगाराम भालेराव, शिवाजी भालेराव, उद्योजक जयसिंग भालेराव, राजू भालेराव, संजू भालेराव, अनिल भालेराव, अरुण भालेराव, सविता भालेराव, किसन भालेराव, भरत कानडे, मुन्ना कानडे, किशोर भालेराव, शशिकांत भालेराव, निलेश येवले, विष्णू कानडे, उद्योजक सचिन भालेराव, भरत भालेराव, संदीप भालेराव, विक्रम भालेराव, सुनील भालेराव, नितीन भालेराव, प्रताप भालेराव, प्रवीण कानडे, शांताराम भालेराव, नवनाथ चासकर, मधुकर महाराज वर्पे, विठ्ठल भालेराव, गणेश वर्पे, दत्ता भालेराव, मयूर भालेराव, निलेश कानडे, अनिल कानडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी हभप गोदावरीताईं मुंडे यांचा सत्कार सभापती उषा कानडे यांच्या हस्ते करण्यात आला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा