गोदावरीच्या संवर्धनासाठी ‘गोदावरी संवर्धन वारी’चे आयोजन

नाशिक – नमामी गोदा फाऊंडेशनच्या माध्यमातून गोदावरीच्या संवर्धनासाठी ‘गोदावरी संवर्धन वारी’ काढण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या 19 ऑगस्टपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. या उपक्रमांतर्गत गोदा प्रेमी आणि त्यांच्यासोबत काही कलाकार हा उपक्रम राबवणार आहेत. देशात पहिल्यांदाच असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गोदावरी नदीला धार्मिकदृष्टीने अत्यंत महत्व दिले जाते. मात्र सध्या ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. आता या नदीच्या संवर्धनासाठी नमामी गोदा फाऊंडेशन गोदावरी संवर्धन वारी काढणार आहेत. या वारीच्या माध्यमातून गोदावरी नदी किनारी असलेल्या वस्त्या आणि गावांमध्ये जाऊन गोदावरी प्रदूषणासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)