गोदाकाठ महोत्सवातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम : पुष्पाताई काळे

कोपरगाव: माजी खासदार कर्मवीर स्व. शंकररावजी काळे यांचे विचार डोळ्यांसमोर ठेवून एक महिला म्हणून बचतगटांच्या महिलांसाठी गोदाकाठ महोत्सव सुरू केला. मागील काही वर्षांपासून हा महोत्सव सुरू आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. त्यातून कर्मवीर स्व. शंकरराव काळे यांचे स्वप्न साकार होत असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी केले.

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित गोदाकाठ महोत्सव 2019 चे उद्‌घाटन मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका चैतालीताई काळे, पंचायत समिती सभापती अनसूयाताई होन, नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार, वर्षाताई कहार, माधवीताई वाकचौरे, ऐश्‍वर्याताई सातभाई, उमाताई वहाडणे, रमाबाई पहाडे, जी. प. सदस्या सोनालीताई रोहमारे, सोनालीताई साबळे, पं. स. सदस्या पौर्णिमाताई जगधने, स्वप्नजाताई वाबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सर्व संचालक मंडळ, विजयराव आढाव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद, सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. पुष्पाताई काळे म्हणाल्या, बचतगटांच्या महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवामुळे बचतगटांच्या उत्पादनांना दिल्लीतून मागणी येत आहे, ही खूप अभिमानाची बाब आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महोत्सवामुळे महिलांना आर्थिक सक्षम होण्यासाठी हातभार लागणार आहे. यावर्षी काही बचतगटांना स्टॉल्स मिळाले नाही. त्यामुळे पुढील वर्षी स्टॉल्स वाढवावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. आशुतोष काळे म्हणाले, बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहे. त्यांच्या यशात गोदाकाठ महोत्सवाचे मोठे योगदान आहे. महोत्सवातून मिळणारा आर्थिक लाभ हा मर्यादित न राहता त्यामध्ये सातत्याने वाढ व्हावी. प्रास्ताविकात चैतालीताई काळे म्हणाल्या, गोदाकाठ महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांना महोत्सवाच्या माध्यमातून मोठी आर्थिक ताकत मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)