गोदाकाठच्या गावामध्ये कडकडीत बंद

वरखेड(ता.नेवासा)-येथे सर्व समाज बांधवांच्या वतीने गाव बंद ठेऊन पाठिंबा दिला.(छाया-सचिन दसपुते)

गोपाळपुर – ९ आँगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला गोदाकाठच्या गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यवसायिका़नी आज सकाळपासूनच आपआपली दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला.

गोदावरी नदीच्या काठी असलेल्या गोपाळपुर मध्ये आज सकाळी गावातील तरूणांनी एकत्र येऊन गावबंदचे आवाहन केले. याला सर्व धर्मियांनी सहभाग घेऊन शासनाचा निषेध केला. अठरा पगड जातीचे गाव म्हणून ओळख असलेल्या वरखेड मध्ये सर्व समाज बांधवांनी बंदला पाठिंबा देऊन आपआपली दुकाने बंद ठेवली. सकाळी सर्व लोक व गावातील तरूणांनी रस्त्यावर येऊन आरक्षणाच्या मागणी साठी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला. शिरसगाव मध्येही आज सकाळपासून आत्यआवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनेबंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोदावरी नदीच्या काठी असलेल्या गोपाळपुर, वरखेड, शिरसगाव खामगाव, रामडोह मध्ये शांततेत बंद पुकारण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)