गोदरेज इंटेरिओ तर्फे पळशी येथे मिनी सायन्स सेंटर उपक्रम राबवण्यात आला

शिरवळ- गोदरेज इंटेरिओ शिरवळ यांच्यातर्फे सामाजिक बांधीलकी जोपासत नवनवीन उपक्रम राबवत असताना अजून एक नवीन उपक्रम पळशी येथे आज राबवण्यात आला. मिनी सायन्स सेंटर स्थापन करण्यात आले. याचे उदघाटन कंपनी चे व्हाइस प्रेसिडेंट श्री रविप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलेया वेळी पळशी गावचे सरपंच आशुतोष भरगुडे व ग्रामपंचायत सदस्य ,पालक,शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते. . हा उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल पळशी येथे राबवन्यात आला.या प्रसंगी रवी प्रकाश म्हणाले कि गोदरेज इंटेरिओच्या सामाजिक उपक्रमांचा एक उद्देश ठेवून शैक्षणिक तसेच शालेय संरचनेचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांला विविध विषयाबद्दल आवड निर्माण होऊन या माध्यमातून विद्यार्थ्यांला मोठा फायदा व्हावा हा सर्वात मोठा हेतू आहे. मला विश्वास आहे कि या प्रयोग शाळेच्या माध्यमातून विध्यार्थी सर्वोत्तम शैक्षणिक यश संपादन करतील व भारतामध्ये सुजाण नागरिक म्हणून उदयास येऊन नाव रोशन करतील. तसेच कंपनी ग्रीन सेल च्या सौ.अश्विनी देवदेशमुख म्हणाल्या कि विद्यार्थ्यांनी या प्रयोग शाळेचा जास्तीत जास्त उपयोग करून विज्ञानातील ज्ञान आत्मसात करून दैनंदिन जीवनातही प्रयोगशील असावे,
मिनी सायन्स सेंटर हस्तांतरणा पूर्वी विज्ञान व गणित या विषयाच्या शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात करण्यात आली होती.या कार्यशाळेमध्ये विधार्थ्यांना गणित व विज्ञान विषयांचे प्रयोग सोप्या व समजतील अश्‍या पद्धतीने शिकवण्यासाठीच्या विविध पद्दतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गोदरेज इंटेरिओ च्या माध्यमातून स्टेम लर्निंग सोलुशन या संस्थे कडून हि उपकरणे खरेदी करण्यात आली.
या पूर्वी गोदरेज इंटेरिओ च्या माध्यमातून शिरवळ विभागामध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ तसेच ज्ञानसंवर्धिनी प्रशाला शिरवळ,येथे विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. तसेच येणाऱ्या काळात शैक्षणिक संस्था व औद्योगिक क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार पूरक शिक्षणासाठी गोदरेज कटिबद्ध आहे.याचे आश्वासन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)