गोदड महाराजांच्या रथयात्रेसाठी कर्जतनगरी सज्ज

कर्जत : श्री सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव सालाबादप्रमाणे बुधवारी (दि.८ जुलै) कर्जत येथे संपन्न होत आहे.रथयात्रा तसेच गुरुवारी होत असलेल्या कुस्त्यांच्या हंगामासाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असुन कर्जतनगरी सज्ज झाली आहे. यात्रोत्सवानिमित्त गेल्या आठवड्यापासूनच विविध दुकाने तसेच पाळणे उभारण्यात आल्याने शहराची शोभा वाढली आहे.

कर्जत येथे श्री सदगुरु गोदड महाराजांची समाधी आहे. गावामध्ये समाधी मंदिरासह जन्मस्थळ मंदिर आहे. रथयात्रेला महाराजांच्या तीन मजली भव्य लाकडी रथाची शहरातून मिरवणूक निघणार आहे. सजविलेल्या रथाला पंचक्रोशीतील भाविक ओढतात. रथावर नियंत्रण ठेवण्याचा मान शहरातील लोहार व सुतार समाजाकडे परंपरागत आहे. दोन्ही समाज दरवर्षी हा मान आनंदाने पार पाडतात. मुर्ती रथात बसविण्याचा मान पुजारी काकडे कुटुंबियांकडे असतो. याशिवाय रथावर विविध समाजाकडे विविध मान असून दरवर्षी दुपारी साडेबारानंतर समाधी मंदिरात मूर्तीला फुल लावले जाते. परमात्मा पांडूरंग आल्याचे फुलाकडून संकेत मिळताच मूर्ती रथामध्ये नेली जाते. दिवसभर हा रथ ठरलेल्या मार्गावरून कर्जत शहराची प्रदक्षिणा करतो. रथाच्या पुढे तालुक्यातील विविध गावातून आलेल्या भजनी दिंड्या भजन करत सहभागी होतात.

-Ads-

रथयात्रेमध्ये विविध वस्तुंच्या विक्रीची दुकाने सध्या सजु लागली आहेत. श्री सदगुरु महाराज मनोरंजननगरीत विविध प्रकारचे पाळणे तसेच सर्कसचे तंबु उभारण्यात आलेले आहेत. नगरपरिषदेच्या वतीने योग्य देखरेख व नियोजन करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान अनुचित प्रकार होवु नयेत यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज होवु लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
55 :thumbsup: Thumbs up
12 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)