गोडोली तळ्याची नगराध्यक्षांकडून घाईघाईने पाहणी

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : नगराध्यक्षा माधवी कदम व मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सोमवारी सायंकाळी 4 वा. गोडोली तळ्याची अचानक पाहणी केल्याने गोडोलीतील नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. एकीकडे मंगळवार तळ्यासाठी खा. उदयनराजेंनी परवानगी दिलेली असताना अचानक मोर्चा गोडोली तळ्याकडे कसा या नगरसेवक शेखर मोरे यांच्या प्रश्‍नावर प्रशासनाला निरुत्तर होण्याची वेळ आली.
दरम्यान, सातारा पालिकेतर्फे उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मंगळवार तळे पुनर्विचार याचिकेवर येत्या 10 तारखेला सुनावणी होणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. न्यायालयाने या प्रकरणातील मुळ याचिकाकर्ते यांना आपले म्हणणे तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.. साताऱ्याचा गणेशोत्सव सोहळा अवघ्या नऊ दिवसांवर येऊन पोहोचला आहे. तरी सुद्धा विसर्जन स्थळाचा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत हेलकावे खात आहे. मंगळवार तळ्यात विसर्जन होणार की नाही यावर न्यायालयीन खल सुरु आहे. असे असताना सोमवारी अचानक नगराध्यक्षा माधवी कदम व मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी गोडोली तळ्याची अचानक पाहणी केली. यावेळी गोडोलीचे नगरसेवक नगरविकास आघाडीचे शेखर मोरे पाटील यांना कोणतीही कल्पना नव्हती. अचानक या झालेल्या भेटीत नागरिकांनी खबर दिल्यानंतर शेखर मोरे यांनी घटनास्थळी येऊन मुख्याधिकाऱ्यांना आपली भूमिका स्पष्ट केली. दरवेळी हद्दवाढीचे कारण सांगून गोडोली तळ्याच्या विकसनाचा मुद्दा डावलला जातो. डीपीडीसीतून गोडोली तळ्याच्या पूर्वेला संरक्षक भिंत व नागरिकांना पाथ वे यासाठी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पालिकेच्या ठरावाची टाळाटाळ केली जाते. राजकीय आकसातून निधी माघारी पाठवण्याचे कारण कशासाठी असा प्रश्‍न मोरे यांनी केल्यावर प्रशासनाची बोलती बंद झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)