गोटेमाळ शाळेत वार्षिक संमेलन उत्साहात

खळद- जिल्हा परिषद शाळा, गोटेमाळ येथे वार्षिक कलाविष्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळेस उद्योजक कैलास कामथे यांनी शाळेस एलएडी टिव्ही देण्याचे जाहीर केले. तसेच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुस्तके देण्याचे माजी सरपंच छायाताई कामथे यांनी जाहीर केले. कार्यक्रमातून गोळा झालेल्या रकमेतुन विद्यार्थ्यांसाठी टॅबलेट घेण्यात यावा, असे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत चव्हाण व भगवान कामथे यांनी सुचविले. यावेळेस विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.यावेळी माजी उपसपंच सुरेश रासकर, सुभाष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या छाया कामथे, मधुकर कामथे गोविंद कामथे, प्रदीप कुंजीर, दत्तात्रय गायकवाड, संदीप कदम, वसंत कामथे, नंदु कामथे, हनुमंत कामथे, सचिन बोरावके, अनिल गळंगे, लक्ष्मण कामथे, तानाजी कामथे, सोपान जगदाळे आदी प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटके, मुकाभिनय असे विविध प्रकार प्रेक्षकांपुढे सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक विजय वाघमारे, चंद्रकला भोईर, अंगणवाडी सेविका पौर्णिमा रासकर, सुप्रिया कादबाने व नवज्योत तरुण मंडळ गोटेमाळ यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)