गोखळीत महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

गोखळी : महात्मा गांधीजींच्या मूलमत्रांची प्रतिज्ञा करताना विद्यार्थी.

गोखळी, दि. 3 (प्रतिनिधी) – फलटण तालुक्‍याच्या पूर्व भागातील गोखळी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी हनुमान माध्यमिक विद्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडीच्या विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना हार व पुष्पगुच्छ अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या उषादेवी गावडे, गोखळी गावचे सरपंच अमित गावडे (भैय्या), तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे (मामा), उपसरपंच ज्ञानेश्वर घाडगे, अमोल हरीहर, हनुमंत जगताप, सखाराम गावडे तसेच गावातील कार्यालयीन अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितानी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच सरपंच मनोज गावडे, संजयकुमार बाचल (विस्तार अधिकारी), ग्रामसेवक गणेश दडस यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी गांधीजींनी सांगितलेल्या मूलमंत्राची प्रतिज्ञा करुन सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसंदर्भात संदेश देण्यात आला. तसेच गोखळी गावाचे सुपुत्र संजयकुमार बाचल (विस्तार अधिकारी) यांचा वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)