गोकुळ संपर्क सभेत राडा; विश्‍वास नेजदार यांना मारहाण

कोल्हापूर – गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्यास झालेल्या करवीर तालुक्‍यातील संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत विरोध करण्यात आला. मात्र हा विरोध पचनी न पडल्याने सत्ताधाऱ्यांनी संस्था प्रतिनिधींच्या अगांवर धावत जावून मारहाण केली. लोकशाही मार्गांने प्रश्न उपस्थित करत असताना अशा प्रकारे गुंडशाही प्रवृतीने संस्था प्रतिनिधींना मारहाण झाल्याच्या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे सत्ताधारी संचालक मंडळाच्या गुंड प्रवृतीचा, गोकुळ बचाव कृती समितीच्या सदस्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या विरोधात पोलीस फिर्याद देखील दाखल करणार असल्याचही सांगण्यात आले.

गोकुळ दुध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्‍वभूमीवर तालुकानिहाय संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभा सुरू आहेत. आज करवीर तालुक्‍यातील संस्थांची संपर्क सभा गोकुळच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात झाली. या सभेसाठी करवीर तालुक्‍यातील, गोकुळ बचाव कृती समितीचे संस्था प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

सध्या गोकुळमध्ये मोठा अनागोंदी कारभार सुरु असल्याने याविरोधात गोकुळ बचाव कृती समितीच्या वतीने आवाज उठविण्यात आला. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा ठराव असल्याने याला देखील तीव्र विरोध करण्यात आला. संपर्क सभेत गोकुळ बचाव कृती समितीच्या सदस्यांनी सत्ताधारी संचालक मंडळाचे वाभाडे काढत लोकशाही मार्गाने काही प्रश्न उपस्थित केले. मात्र संचालक मंडळाकडून यावर समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने, गोकुळ बचाव कृती समितीच्या सदस्यांनी, आक्रमकपणे आपले प्रश्न संपर्क सभेत मांडले.

मात्र विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर न देता सत्ताधारी संचालक मंडळाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत अंगावर धावून येत असल्याचे ज्येष्ठ सभासद विश्वास नेजदार यांनी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. गोंधळ न करता आम्ही विचारलेल्या प्रश्नांची संचालक मंडळाने समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशी मागणीही नेजदार यांनी केली. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी संचालक मंडळाच्या बगल बच्चानी गुंडशाही प्रवृतीने गोंधळ घालण्यास सुरवात केली.
विश्वास नेजदार यांच्या दिशेने काही जणांनी धाव घेत त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली.

तसेच गोकुळ बचाव समितीच्या इतर सदस्यांना देखील धक्काबुकी करण्यात आली. त्यामुळे सभेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता. विश्वास नेजदार यांच्यासारख्या ज्येष्ठ सभासदांना, गुंडशाही प्रवृतीच्या तरुणांनी मारहाण केल्याने याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. या विरोधात आज जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देखील निवेदन देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)