गोकुळ शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी केले रक्तदान

सातारा – कृष्णानगर येथील सातारा जिल्हा बाल विकास समिती संचलित गोकुळ प्राथमिक शाळा भारत विकास परिषद सातारा राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय फौंडेशन यांचे वतीने रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात गोकुळ शाळेच्या माजी विद्यार्था, पालक, शिक्षक अशा 27 जणांनी रक्‍तदान केले या रक्तदान शिबीराचे हे 3 रे वर्ष आहे.

रक्‍तदान शिबिरासाठी माऊली ब्लड बॅंकेचे डॉक्‍टर नर्स यांची टीम आली होती. या रक्तदान शिबिरा प्रसंगी गोकुळ शाळेच्या मुख्याधिपिका सौ अनधा कारखानीस यांनी रक्‍त्दान हे सर्वश्रेष्ठ दान कसे असते तसेच मुलांमध्ये देश सेवेचे व्रत जागे व्हावे, गरजूंना रक्‍तदान करावे आदी गोष्टी विषयी मार्गदर्शन केले. रक्‍तदानासारखे दुसरे दान जगात कुठेही नाही, मी रक्‍तदान करनारच अशी भावना मुलांच्या मनात रूजली पाहिजे.

शहरातील महाविद्यालयात सुद्धा रक्‍तदान शिबिरांचे आयोजन केले पाहिजे. असेही आवर्जुन सांगितले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गोकुळ शाळतील मुख्याध्यापिका अनधा कारखानीस शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)