गोकुळ तर्फ येथे बिबट्याकडून सहा शेळ्या ठार

पाटण, दि. 13 (प्रतिनिधी) – मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पानजीक असलेल्या गोकुळ तर्फ पाटण या गावातील सहा शेळ्यांचे बिबट्याने गळे घोटल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेने गावातील लोक भयभीत झाले आहेत. याची माहिती देवूनही वनविभाग केवळ बघ्याची भूमिका बजावत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोकुळ तर्फ पाटण येथील मारुती अर्जुन चोरगे यांचा शेळ्यांचा कळप आहे. घराशेजारीच शेळ्यांचा गोठा असून आसपास ऊस शेती आहे. या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने रात्री बारा वाजण्याचे सुमारास कुडामेडीच्या असलेल्या गोठ्याचा कूड फाडून गोठ्यात प्रवेश करीत सहा शेळ्यांचे गळे फोडून त्यांना ठार केले. हल्ला झाल्याच्या दुसर्‍या दिवशी मोरगिरी पशुवैद्यकीय अधिकारी व वनविभागाचे वनसंरक्षक लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गोकुळ गावात अद्याप भितीचे वातावरण असून वनविभागाने केवळ बघ्याची भूमिका न घेता बिबट्यास पकडण्यासाठी सापळा लावावा. तसेच वनविभागाचे कर्मचारीही गावात मुक्कामास असावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)