गोकुळमधील नोकर भरतीला स्थगिती

नागपूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या जुलै 2018 पासून सुरू केलेल्या 429 पदाच्या मेगा नोकर भरतीबाबत आरक्षणाची नियमावली पाळली नसेल तर चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानपरिषदेत केली.

गोकुळ नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याची लक्षवेधी सूचना सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावेळी पाटील यांनी सदर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असून ती नियमाने होत नाहीे. 429 पदांच्या या भरतीमुळे 20 कोटींचा बोजा असल्याने भविष्यात कामगारांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने दूरगामी विचार करून या भरती प्रक्रियेला त्वरित स्थगित देण्याची मागणी केली.

कोल्हापुर जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया करताना बॅंकेला वेगळा न्याय आणि दूध संघाला वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला असता दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी सरकारचे या दूध संघात भाग भांडवल नाही. तसेच सहकार खात्याच्या नियमानुसार ही भरती प्रक्रिया होत असल्याचे सांगत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय खात्याने मागासवर्गीय भरती आरक्षणाची तरतूद केली नसल्याचे सांगितले.

यावर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेत जर सहकार खात्याकडे संघाची नोंदणी होते. त्यामुळे या संघाला सहकार कायदा लागू होतो. ज्या शाहू महाराजांनी मागासवर्गीय आरक्षणाची भूमिका प्रथम मांडली त्या कोल्हापुरात जर मागासवर्गीय आरक्षणाची भूमिका डावलली जात असेल तर हे चुकीचे आहे, असे संगत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करताना भरती प्रक्रियेला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली.

एकूणच सभागृहातील सर्व आमदारांच्या भावना लक्षात घेता पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी गोकुळच्या भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, प्रवीण दरेकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, संजय दत्त यांनी सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)