गोकुळचे उर्जाबचतीमधील योगदान हे राष्ट्रीय कार्य – बावनकुळे

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) या सहकारातील अग्रगण्य दूध संघाने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा इ. क्षेत्रात नेत्रदीपक काम करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावलौकिक मिळविलेला आहे. त्यांनी दूध उत्पादकांची उन्नती साधताना ग्रामीण भागाचा कायापालट केलेला आहे. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच ग्रामीण विकास साधण्याचे महत्वपूर्ण काम गोकुळ दूध संघाने चांगल्या प्रकारे केलेले आहे. दूध उत्पादकांनी किफायतशीर व शास्त्रशुध्द दुग्ध व्यवसाय करावा याकरिता दूध उत्पादकांच्या गोठ्यापर्यंत विविध योजना राबवून गोकुळने दुग्ध व्यवसायास चालना दिलेली आहे.

हे करत असताना उर्जाबचत, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती यासारखी राष्ट्रीय व सामाजिक कार्ये करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावलेला आहे. गोकुळने महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सहकार भूषण पुरस्कार सलग तीन वर्षे मिळविलेला आहे. गोकुळची गुणवत्ता कौतुकास्पद आहे. गोकुळने उर्जाबचतीचा महाराष्ट्र शासनाचा सलग पाचवा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून पुनः एकदा या क्षेत्रात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेले आहे असे प्रतिपादन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे येथे राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या उर्जाबचत पुरस्कार वितरण प्रसंगी केले.

पुणे येथे मेडा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये गोकुळला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व .गिरीश बापट- अन्न व औषध प्रशासन मंत्री, .दिलीप कांबळे, राज्यमंत्री सामाजिक न्याय व पुनर्वसन व विजयबापू शिवतारे- राज्यमंत्री जलसंपदा व जलसंवर्धन, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंग, महासंचालक बिपीन शर्मा, ब्युरो ऑफ एनर्जी इफिसीएन्सी, नवी दिल्ली चे महासंचालक अभय भाकरे  उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)