गोएअरची आंतरराष्ट्रीय सेवा

मुंबई: वाडिया समूहाची मालकी असणाऱ्या आणि परवडणाऱ्या किमतीत हवाई सेवा देणारी गोएअर (गो एअरलाईन्स कंपनी) ऑक्‍टोबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना प्रारंभ करेल. मुंबई-फुलेत (थायलंड) मार्गावर कंपनीचे पहिले विमान धावणार असल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय पातळीवर सेवा देणारी ही देशातील पाचवी कंपनी ठरेल. मुंबईमध्ये मुख्यालय असणाऱ्या या कंपनीला आंतरराष्ट्रीय सेवा देण्यासाठी दोन वर्षांपूर्वीच मंजुरी देण्यात आली.

कंपनीने गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र, इंजिनांमधील समस्येमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. मार्चपासून तीन ते चार आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर सेवा देण्यात येईल, तर मुंबई-फुलेत ही दैनंदिन फेरी असेल. थायलंडमध्ये सेवा देण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी मंजुरी मिळाल्याचे थायलंडचे भारतातील राजदूत गोंगसक्‍डी यांनी सांगितले. नोव्हेंबर 2005 मध्ये कंपनीने देशात सेवेला प्रारंभ केला असून चीन, व्हिएतनाम, मालदीव, कतार, सौदी अरेबियात सेवा देण्यासाठी 2016 मध्ये परवानगी मिळाली. सुरुवातीला परदेशातील सेवांसाठी कमी विमाने वापरली जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यानंतर या विमानांची संख्या वाढविण्यात येईल, असे कंपनीने म्हटलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)