गोंदिया येथे लवकरच विमानसेवा सुरु होणार – राजकुमार बडोले

नवी दिल्ली: केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत गोंदिया येथे लवकरच विमानसेवा सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.

राजकुमार बडोले यांनी आज उद्योग भवन येथे नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत श्री. बडोले यांनी गोंदिया येथे विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली. उभय मंत्र्यांमध्ये  यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत गोंदिया येथे विमान सेवा सुरु करण्याची  ग्वाही  श्री प्रभू यांनी दिल्याचे बडोले यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही बडोले म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोंदिया येथे विमानसेवा सुरु झाल्यास या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वासही बडोले यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)