गोंदिया-भंडाऱ्यात 50 ठिकाणी पुन्हा मतदान होणार

मुंबई : गोंदिया –भंडारा लोकसभा मतदारसंघातील 50 ठिकाणी उद्या (30 मे 2018) पुन्हा मतदान घेतले जाणार आहे. , ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजे 30 मे रोजी मतदान पार पडणार असून, नेमकी वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.

गोंदिया-भंडारा मतदारसंघात 25 टक्के मशिन्स बंद पडल्याने मतदानावर परिणाम झाला होता. अनेक तास मतदार उन्हा-तान्हात ताटकळत उभे होते. पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता काँग्रेसमध्ये असलेल्या नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदारसंघात 28 मे रोजी मतदान पार पडले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)