गोंदियात नायब तहसिलदाराला चप्पलने मारहाण 

गोंदिया – गोंदियातील एका महिला कर्मचाऱ्याने चक्‍क कार्यालयातच नायब तहसिलदाराला चप्पलने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. महात्मा गांधी योजना अनुदानाचे बिल दिवाळी पूर्वी न काढल्यामुळे या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या महिलेने थेट पायातली चप्पल काढत तहसीलदारांना अक्षरश: झोडले.

ही घटना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील कार्यालयात घडली. या संपूर्ण घटनेचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. गोंदियाच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ सालेकसा तालुक्‍यात महात्मा गांधी रोजगार योजनेंतर्गत ग्रामस्थांनी अनेक कामे केली आहेत. मात्र दिवाळीआधी नागरिकांना मोबदला न मिळाल्याने महिला कर्मचारी वर्षा वाढई यांनी नायब तहसीलदार आय. आर. पांडे यांच्याकडे बिल पास करून देण्याची मागणी केली.

मात्र नायब तहसीलदार यांनी महिला कर्मचाऱ्याची मागणी धुडकावून लावली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने वर्षा वाढई यांनी नायब तहसीलदार पांडे यांना चप्पलने मारहाण केली. नायब तहसीलदार यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आणि महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आज सालेकसा तहसील कार्यलयासमोरच एक दिवशीय आंदोलन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)