गोंदियातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पास भीषण आग

गोंदिया : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात भीषण आग लागली असून आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर वन्य प्राण्यांनाही या आगीचा फटका बसत आहे. तेंदूपत्ता व्यापाऱ्यांकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय आहे.

तेंदूची लहान झाडं जळली की 15 दिवसात झाडाला मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटते, असा व्यापाऱ्यांचा समज आहे. त्यामुळेच मजुरांच्या सहाय्याने अवैधरित्या जंगलात आग लावली जाते. दुर्दैवाची बाब म्हणजे तेंदूपत्ता व्यापाऱ्यांनीच ही आग लावल्याचे सिद्ध झाले तरी विभागनिहाय 15 हजार रुपयांचा नाममात्र दंड आकारला जातो. तर एखाद्या वेळेस त्याचा करार रद्द केला जातो.

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्र समजला जाणाऱ्या मुरदोली, दोडके, पुतळी, डूगीपार, शेंडा, कोयलारी, आलेबेदर या 15 कंपार्टमेंटमध्ये आग लागली असून याच परीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा वावर असतो. या आगीची झळ वन्य प्राण्यांना बसल्याची शक्यता नाकारता येत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)