गोंदवले बुद्रुकचा विकास आराखडा विधानसभेत सादर करणार

मुंबई : गोंदवले बुद्रुकच्या विकास आराखड्याबाबत ना. विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. (छाया ः संदीप जठार)

पालकमंत्री विजय शिवतारे यांचे आश्‍वासन
गोंदवले, दि. 11 (प्रतिनिधी) – तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत क्षेत्र गोंदवले बुद्रुक (ता.माण)च्या विकासाचा संपूर्ण आराखडा विधानसभेत सादर करणार असल्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले.
श्रीब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे समाधी मंदिर असलेल्या गोंदवले बुद्रुकच्या विकासासाठी ग्रामपंचायतीने तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई येथे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दिलीप येळगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) एस. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) संतोष रोकडे, उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा, माण) सुधाकर कदम, शिवाजीराव शिंदे, सरपंच अश्विनी कट्टे, उपसरपंच संजय माने, अंगराज कट्टे, अरुण कट्टे, सुरज पाटील, मालोजी फडतरे, राजेंद्र कट्टे, सतीश अवघडे, रत्नाकर मोकाशी, शिवाजी कचरे, सचिन रणपिसे, दादासो शिंगाडे, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र गोंदवल्यात येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा मिळावी व कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी गावातील विविध कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा पालकमंत्री शिवतारे यांच्याकडे सादर करण्यात आला. आराखड्यात सुचवलेल्या विविध विकासकामांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी येत्या ऑक्‍टोबरला (रविवारी) गोंदवल्यात बैठक घेण्याचे आदेश मंत्री शिवतारे यांनी दिले. बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मंदिर समिती व सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर लगेचच अंतिम आराखडा तयार करून विधानसभेत सादर करू असेही सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)