गोंदवले खुर्द येथील मुलींचे कराटे स्पर्धेत यश

गोंदवले- सातारा शाहू स्टेडियम येते झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत दहिवडी महाविध्यालयाची विध्यार्थीनी कु. प्राची संजय अवघडे हिने यश मिळवले. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

प्राची अवघडे दहिवडी महाविद्यालयात 12 वीत आहे. शाहू स्टेडियम येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा झाल्या. त्यात तिला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक ए. ए. जाधव व मास्टर विजय अवघडे यांनी तिला मार्गदर्शन केले. या यशाबद्दल प्राचार्य बी. टी. जाधव, सचिन अवघडे-पाटील, राजकुमार कदम, संजय अवघडे व गोंदवले ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)