गोंदवले खुर्द येथील बंधाऱ्याला ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे गळती

गोंदवले – गोंदवले खुर्द येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात ठेकेदाराने केलेल्या निकृष्ठ कामामुळे पाणी वाया जात असून निकृष्ट प्रकारचं काम करुनही ठेकेदाराने कामाच्या बिलासाठी पाटबंधारे खात्याकडे राजकीय तगादा लावला आहे. मात्र, या याबाबत वरिष्ठांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच अर्जुनराव शेडगे यांनी सांगितलं आहे.

माण नदीवर कुकडी पाटबंधारे प्रकल्प जिहे-कठापुर अंतर्गत अकरा बंधारे असून या बंधाऱ्याच्या दारांमध्ये लोखंडी फळ्या टाकून बंधारा पॅक करण्याचं काम वाई येथील संस्थेला मिळालं आहे. या संस्थेने हे फळ्या वेळेत बसवणे गरजेचे होते, मात्र ते काम त्यांनी वेळेत केले नव्हते. त्यामुळे बंधाऱ्यांतून पाणी मोठया प्रमाणात वाहून गेले व कोरडे पडले. हे बंधारे दुष्काळी भागात शेतीला पाणी मिळण्यासाठी बांधले आहेत. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर आहे. दरवाजे न बसवल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. माणगंगा नदीवर असलेल्या अशा अनेक कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत होता. हे पाणी पूर्णत: वाया गेले आहे. सध्या उरमोडीमधून पिंगळी तलाव भरण्यासाठी पाणी सोडले असून यादव मळ्यात असणारा कच्चा कॅनॉल थोडा फुटल्याने पाणी माण नदीत सोडले आहे. मात्र, माण नदीत असणारे बंधारे व्यवस्थित न अडवल्याने हे ही पाणी वायाच जात आहे.

लोकांना याचा म्हणावा, असा फायदा होणार नाही. दरवर्षी या कामावर लाखो रुपये खर्च करून काय उपयोग? दरवर्षी पाटबंधारे विभाग ठेकेदारा मार्फत दरवाजे बसवते. यावर्षी वाईच्या एका ठेकेदाराला माण आणि खटाव तालुक्‍यातील वीस बंधाऱ्याच्या फळ्या बसवण्याचे काम देण्यात आले आहे. त्याप्रमाणे सध्या फळ्या बसवल्या आहेत, पण कोणत्याही प्रकारच टेक्‍निक यात वापरलं गेलं नाही. दोन फळ्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. सध्या ढगाळ वातावरण येत असून कदाचित पाऊस पडला आणि पाणी साठा झाला तरी या फळ्यांमधून पाणी वाहूनच जाणार आहे. हे काम करत असतात पाटबंधारे विभागाचे कोण तरी सुपरवायझर असणे गरजेचे होते. ते असते तर किमान काम चांगले झाले असते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

माण नदीवर कुकडी पाटबंधारे प्रकल्प जिहे-कठापुर अंतर्गत अकरा बंधारे असून या बंधाऱ्याच्या दारांमध्ये लोखंडी फळ्या टाकून बंधारा पॅक करण्याचं काम वाई येथील संस्थेला मिळालं आहे. या संस्थेने हे फळ्या वेळेत बसवणे गरजेचे होते, मात्र ते काम त्यांनी वेळेत केले नव्हते. त्यामुळे बंधाऱ्यांतून पाणी मोठया प्रमाणात वाहून गेले व कोरडे पडले. हे बंधारे दुष्काळी भागात शेतीला पाणी मिळण्यासाठी बांधले आहेत. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर आहे.

दरवाजे न बसवल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. माणगंगा नदीवर असलेल्या अशा अनेक कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत होता. हे पाणी पूर्णत: वाया गेले आहे. सध्या उरमोडीमधून पिंगळी तलाव भरण्यासाठी पाणी सोडले असून यादव मळ्यात असणारा कच्चा कॅनॉल थोडा फुटल्याने पाणी माण नदीत सोडले आहे. मात्र, माण नदीत असणारे बंधारे व्यवस्थित न अडवल्याने हे ही पाणी वायाच जात आहे. लोकांना याचा म्हणावा, असा फायदा होणार नाही.

दरवर्षी या कामावर लाखो रुपये खर्च करून काय उपयोग? दरवर्षी पाटबंधारे विभाग ठेकेदारा मार्फत दरवाजे बसवते. यावर्षी वाईच्या एका ठेकेदाराला माण आणि खटाव तालुक्‍यातील वीस बंधाऱ्याच्या फळ्या बसवण्याचे काम देण्यात आले आहे. त्याप्रमाणे सध्या फळ्या बसवल्या आहेत, पण कोणत्याही प्रकारच टेक्‍निक यात वापरलं गेलं नाही. दोन फळ्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. सध्या ढगाळ वातावरण येत असून कदाचित पाऊस पडला आणि पाणी साठा झाला तरी या फळ्यांमधून पाणी वाहूनच जाणार आहे. हे काम करत असतात पाटबंधारे विभागाचे कोण तरी सुपरवायझर असणे गरजेचे होते. ते असते तर किमान काम चांगले झाले असते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी शासनाकडून टेंडर मागवून बंधारे पॅक केले जातात. यावेळी टेंडर उशिरा मंजूर झाले. त्यानंतर त्यांनी काम केलं आहे. याच कामाची पाहणी करणार आहोत. काम योग्य नसेल तर आम्ही ते व्यवस्थीत पूर्ण केल्याशिवाय बील अदा केले जाणार नाही.
– सुभाष खाडे
उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग

हा बंधारा गावाच्या वरील भागात असल्याने याचा अर्ध्या गावाला व शेतीला मोठा फायदा होतो. मात्र हे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. संबंधित ठेकेदाराने ते व्यवस्थीत करून द्यावे, अन्यथा सर्व शेतकरी उपोषण करणार आहोत.
– अर्जूनराव शेडगे,
माजी सरपंच गोंदवले खुर्द


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)