गोंदवलेत वीज वाहक तारांमूळे डंपरने पेट घेतला

युवकांच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली
गोंदवले, दि. 5 (प्रतिनिधी) – सातारा- पंढरपूर महामार्गाच्या सुरू असणाऱ्या कामावर रस्त्यावर मुरूम टाकणाऱ्या डंपरचा उच्च वीज वाहक तारेला स्पर्श झाला.त्यामूळे स्पर्किंगने डंपरने पेट घेतला. यात डंपरचे नुकसान झाले. मात्र धाडसी युवकांनी पेटलेल्या डंपारची आग आटोक्‍यात आणली, यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सातारा-पंढरपूर या मार्गाचे महामार्गात रूपांतर झाल्याने मेल कंपनी मार्फत सातारा ते पंढरपूर रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. गोंदवले खुर्द मध्ये सातारा येतील सागर पाटील,दीपक ढवळे, शशिकांत पवार हे या कामाचे ठेकेदार आहेत. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुनिता मंगल कार्यालय व वनराज ढाब्या समोर रस्त्यावर नवीन क्रॉंकिटिकरण करण्यात आलेल्या भागाच्या साईडपट्टीला मुरूम भरण्याचे काम सुरू होते. डंपर चालक जाधव हे मुरूम घेऊन आले. मुरुम ओतताना वर तारा आहेत डंपर उचलू नका असे काही जणांनी ओरडून सांगितले. मात्र त्याला आवाज ऐकू आला नाही. त्याने डंपरचा हौदा वर उचलला आणि त्यातील काही मुरूम खाली पडला. सगळा मुरूम पाडण्यासाठी त्याने डंपरला जोरात झटका दिला व त्याचे वरचे लोखंडी टोक गोंदवले ह्या एजी 11 के व्ही विद्युत तारेला चिकटले. त्यावर ते अडकून राहिले व त्याच ठिकाणी ठिणग्या पडायला सुरुवात झाली. घाबरून चालकाने वरून उडी मारली मात्र त्या ठिणग्यांमुळे टायरने व ऑईल ने पेट घेतला. डंपरच्या डाव्या बाजूच्या टायरने पेट घेतल्याने चार टायर पूर्ण पेटले. यावेळी सर्व वाहने जागच्या जागी थांबली होती. ही आग वाऱ्याने डिझेल टाकीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात भडकू लागली. मात्र डंपर चालक जाधव, किरण शेडगे, सुनील माने, गणेश नवगण, प्रवीण अवघडे, असिफ मुल्ला, गणेश वायदंडे, कुमार वायदंडे या धाडसी युवकांनी कोणतीही पर्वा न करता जीव धोक्‍यात घालून आग आटोक्‍यात आणली. म्हसवड येथील अग्नीशमन दलाची गाडी आली व पुढील कार्यवाही झाली. म्हसवड , पंढरपूर, सोलापूरकडे जाणारी सर्व वाहने या वेळी थांबवण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)