गोंदवलेत दफनभूमिच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

गोंदवले : मुस्लिम समाज दफनभूमीच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन करताना सरपंच अश्विनी कट्टे व इतर. (छाया : संदीप जठार)

गोंदवले, दि. 8 (प्रतिनिधी) – गोंदवले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने दफनभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे भविष्यातील अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मुस्लिम दफनभूमी व ईदगाह परिसर एकत्र आहे. दहिवडी रस्त्यालगत असणाऱ्या या ठिकाणी परिसरातील विविध गावचे मुस्लिम बांधव ईदच्या नमाज पठणासाठी येत असतात. या परिसरातच दफनभूमी देखील असल्याने या संपूर्ण परिसराला संरक्षक भिंतीचे बांधकाम व्हावे अशी मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात येत होती.
समाजाची ही मागणी सुरुवातीला आमदार जयकुमार गोरे यांनी मान्य करून निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून या परिसराच्या एका बाजूच्या भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. शिवाय मुस्लिम समाजानेही लोकसहभागातून एक बाजू बंदिस्त केली आहे. परंतु, अद्यापही काही भाग मोकळाच असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ही गरज ओळखून ग्रामपंचायतीने नागरी सुविधा योजनेतून सुमारे तीन लाख रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून प्रत्यक्ष कामाला देखील सुरूवात करण्यात आली आहे. सरपंच अश्विनी कट्टे, उपसरपंच संजय माने यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या विद्या कट्टे, हाफीजा तांबोळी, सतीश अवघडे, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार, तांबोळी जमातचे अध्यक्ष डॉ. समीर तांबोळी, मुस्लिम समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)