गोंदवलेतील साहसी युवकांचा सत्कार

मंदिराच्या शिखरावर गेलेल्या युवकाला आणले होते खाली

गोंदवले, दि. 4 (वार्ताहर) – गोकुळाष्टमी निमित्त सर्वत्र गोविंदाच्या दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे उभे राहत असतानाच 50 फूट उंचीवरील मानवी जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आधुनिक गोविंदाचा सन्मान गोंदवल्यात समाधी मंदिर समितीने केला. मंदिराच्या शिखरावर चढलेल्या युवकाला खाली आणणाऱ्या जिगरबाज तरुणांचे परिसरात कौतूक होत आहे.

गोंदवले बुद्रुक येथील श्रीब्रम्हचैतन्य महाराज समाधी मंदिराच्या शिखरावर राजेंद्र कदम हा माथेफिरू युवक दहा दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चढला होता. त्यावेळी समाधी मंदिर व्यवस्थापन, प्रशासन तसेच ग्रामस्थांनी खाली आणण्यासाठी प्रयत्न करूनही तो तीन तास शिखराच्या टोकावर उभा होता. त्याला खाली आणण्यासाठीचे सर्व पर्याय संपल्यानंतर गावातील युवकांनी चारी बाजूने थेट शिखरावर चढाई केली होती. त्यावेळी कदमनेही प्रतिकार करत स्वतःवर ब्लेडने वर करून घेतले होते. मात्र, त्याही परिस्थितीत अशोक अवघडे, सुरज अवघडे, चंद्रकांत माने, प्रमोद रणपिसे,शिवाजी फडतरे, अमोल अवघडे, लखन पारसे, सचिन पाटोळे, धैर्यशील पाटील यांनी जीवाची बाजी लावून त्याला शिखरावरून सुखरूप खाली आणले होते.

आत्तापर्यंत मंदिरावर कसलेच संकट आले नव्हते. मात्र त्यादिवशी गावातील तरुणांनी केलेल्या धाडसाने संकट दूर झाले. या धाडसाची दखल घेवून समाधी मंदिर समितीने गोकुळाष्टमी दिवशी या गोविंदांचा सत्कार केला. त्यावेळी समाधी मंदिर हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही सदैव तयार राहू अशी. ग्वाही यावेळी सत्कारमूर्तींची दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)