गोंदवलेकर ट्रस्टकडून गावाला पाणीपुरवठा

गावकऱ्यांच्यावतीने ट्रस्टचा सन्मान

गोंदवले –  दुष्काळी परिस्थितीत उरमोडीचे पाणी उपलब्ध करून देण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल श्रीब्रम्हचैतन्य महाराज समाधी मंदीर समितीच्या विश्‍वस्तांचा गोंदवलेकर ग्रामस्थांनी सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली.
सलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने गोंदवले परिसरात तीव्र पाणीटंचाई असून गावाला पाणीपुरवठा होणारा आंधळी तलावदेखील रिकामा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समाधी मंदिर परिसराला पाणीपुरवठा होणाऱ्या पिंगळी तलावालगतच्या विहिरीचीही पातळी खालावल्याने श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पाणीप्रश्‍न जटील बनला होता. त्यामुळे उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात सोडण्याची विनंती समाधी मंदिर समितीच्या विश्‍वस्तांनी केली होती. पिंगळी खुर्दपासून हे पाणी थेट समाधी मंदिरालगतच्या बंधाऱ्यात येऊ शकते. हेच पाणी पुढे माण नदीपात्रातील बंधाऱ्यापर्यंत हे पाणी नेल्यास गावांचाही पाणीप्रश्‍न सुटू शकतो. म्हणून मंदिराच्या विश्‍वस्तांनी पदाधिकाऱ्यांसह या योजनेच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार संबंधितांनी पाण्याची उपलब्धता करून दिली.

त्यामुळे आता पुण्यतिथी महोत्सवतील पाणीप्रश्‍नासह गावाचाही पाणीप्रश्‍न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. उरमोडीच्या या पाण्याची पाणीपट्टी सुमारे सव्वाचार लाख रुपये देऊन संपूर्ण आर्थिक भारदेखील समाधी मंदिर समितीनेच उचलला. त्यामुळे गावासाठी नेहमीच योगदान देणाऱ्या मंदिराच्या विश्‍वस्तांप्रती ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. नुकतेच तहसीलदार बी. एस. माने यांच्या हस्ते विश्‍वस्तांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेर, सरपंच अश्‍विनी कट्टे, उपसरपंच संजय माने सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)