गोंदण की टॅटू

डॉ. निलम ताटके

ग्रामीण भागात फिरतांना बहुतांश व्यक्‍तींच्या हातावर, कपाळावर, दंडावर गोंदलेले दिसते. त्या गोंदणाचा रंग फिकट हिरवा त्यात पारवा रंग मिसळला की जशी छटा तयार होईल तसा असतो. या गोंदणाची सुरूवात नक्‍की केव्हा सुरू झाली असेल ते काहीच सांगता येत नाही. परंतु याचा इतिहास पाहिला तर असे आढळते की, माणसाने जंगलात रहात असतांना जंगली श्वापदांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी कपाळावर, हातावर, गळ्यावर सांकेतिक चिन्हे काढून घेत असत. यातूनच गोंदण्याची पद्धत सुरू झाली असावी.

 

गोंदण वेगवेगळ्या प्रकारची केली जात. यात स्वत:चे नाव, आई-वडिलांचे नाव, देवतेचे नाव, तुळशीवृंदावन, ओंकार, शंकर, चक्र इत्यादी चिन्हे काढली जात असत. काही जण मित्र प्रेम, बंधूप्रेम म्हणून त्यांची नावे गोंदवून घेत. स्त्रियांच्या हनवटीवरचे तीन तीळ त्यांचे सौंदर्य खुलवत असत.
हे गोंदण कशाने करतात याची उत्सुकता वाटते ना! गोंदण्यासाठी कारल्याचा रस काढून तो गोड्या तेलाचं कोरडं काजळ काढून ते खलून त्याचे मिश्रण करून गोंदण काढतात. या केलेल्या मिश्रणातून सुईच्या टोकाने जिथे गोंदायचे असेल तिथे टोचून हवे ते गोंदवले जाते. गोंदवणं पूर्ण झालं की त्या जागी एरंडेल आणि हळदीच्या मिश्रणाचा लेप लावतात. नंतर या गोंदण्याच्या प्रक्रियेत बदल झाला. गोंदण्याचे रासायनिक निश्रणही मिळू लागले आणि गोंदवण्याचे यंत्रही आले. त्या यंत्राच्या साहाय्याने शरीरावर पाहिजे तिथे गोंदवता येते.

नंतरच्या काळात गोंदणाला “टॅटू’ या नावाने स्टेटस्‌ मिळालं आणि शहरी भागातही ते लोकप्रिय झालं. हे बहुधा रसायन मिश्रित शाईने केले जाते. गोंदणातील चंद्र, सूर्याऐवजी ड्रॅगन, आधुनिक फूल, पानांची नक्षी आले. टॅटू एकाच रंगाने किंवा दोन-तीन रंगात काढतात. यातही मित्र-मैत्रीण, पत्नी यांची आद्याक्षरे काढतात. टॅटू ऍबस्ट्रॅक्‍टही असतात.

बहुदा गोंदलेलं कायम रहातं आणि टॅटू मात्र तात्पुरते रहातात. यातल्या रसायनांमुळे त्वचेला त्रास होण्याचा संभव असतो. शिवाय टॅटूसाठी त्याच त्यात सुया वापरल्या तर संसर्ग होण्याची शक्‍यता असते. यासाठी टॅटू करतांना काळजी घ्यावी लागते. खरं तर गोंदण हे पूर्णपणे भारतीय परंतु आपर ते कालबाह्य ठरवलं. परंतु पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या वेडापायी त्याच गोंदणाचे टॅटू शब्द वापरून अनुकरण केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)