गॉगल-बिगल…

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेनुसार योग्य रंगाची फ्रेम निवडा. पांढरा आणि सिल्वर भडक दिसतो. हलका गोल्डन, काळा, ब्राऊन रंगाची फ्रेम चांगली दिसते. तसेच गडद निळी फ्रेम चेहऱ्यावरील डाग लपवण्यात मदत करते. लाल फ्रेम चंकी-फंकी असल्यामुळे रेग्युलर यूज करणे योग्य ठरणार नाही.

ओव्हल फ्रेम ओव्हल चेहऱ्यावर सूट करत नाही. स्क्वेअर चेहऱ्यासाठी राऊंड फ्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात. तसेच राऊंड किंवा ओव्हल शेप चेहऱ्यासाठी स्क्वेअर शेप फ्रेम सूट करेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गॉगल्सच्या मधला भाग नाकावर येत असेल तर अशा गॉगल्समध्ये चेहरा लांब दिसतो. अशात गाल आणि डोळ्यांचा काही भाग दिसत असतो. अशी फ्रेम लहान चेहरा असणाऱ्यांसाठी योग्य असते. जेव्हा गॉगल्सच्या मधला भाग ग्लासेसच्या अगदी मधोमध असल्यास लांब चेहरा लहान दिसतो. हा भाग खाली असल्यासही चेहरा लहान दिसतो. लांब चेहरा असल्यास ही फ्रेम सूट करते.

मोठ्या फ्रेमचे सनग्लासेस फॅशनमध्ये असले तरी आपण गॉगल्सचा आकार आपल्या चेहऱ्याप्रमाणे निवडावा. फॅशन म्हणून सामान्य चेहऱ्यावर मोठे गॉगल्स लावल्याने पूर्ण चेहरा झाकला जातो. गॉगल्स लावल्यावर आपले नाक खेचले जात असेल तर हा आकार आपल्यासाठी योग्य नाही. आपण जरा मोठ्या आकाराचा गॉगल निवडायला हवा.

ही काळजी घ्या
– स्वस्त सनग्लासेस वापरू नये. नेहमी उत्तम क्वॉलिटीचे ग्लासेस खरेदी करा. स्वस्त ग्लासेसने डोळ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
– गॉगल्स नेहमी त्याच्या कव्हरमध्ये ठेवावा आणि त्यांना नरम कपड्याने हलक्‍या हाताने पुसावे. ग्लासेसवर स्क्रेच पडता कामा नये.
– उन्हात बाहेर जाताना त्वचेप्रमाणे डोळ्यांचीही काळजी घेतली पाहिजे. जसं की, त्वचेचं अल्ट्राव्हायोलेट (अतिनील किरणं) किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशनचा उपयोग केला जातो. युव्ही कोटेड सनग्लासेसचा वापर करावा. कारण अल्ट्राव्हायोलेट किरणं डोळयावर पडल्याने मोतीबिंद होतो. रेटिनावरही परिणाम होतो.
– उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रेमच्या चारी बाजूला रॅप असणारे चष्मे वापरावेत. अल्ट्राव्हायोलेट किरणं पाणी तसंच बर्फावरून सर्वात जास्त परावर्तित होतात. वॉटर स्पोर्टस्‌ खेळणाऱ्यांनी युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा. न केल्यास डोळे लाल होऊ शकतात. डोळ्यांतून सतत पाणी येतं. कॉर्लियावर परिणाम होतो.
– सायकल चालवणं, धूळ, मातीमध्ये बाइक चालवतानाही युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा. दगड, माती आणि धुळीपासून डोळ्याचं संरक्षण करावं.
– स्वीमिंग पूलमध्येही डाळ्यांचं आरोग्य राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. याच कालखंडात संसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे स्वीमिंगपूलमधील पाणी जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्याकरता त्यात क्‍लोरीन आणि अन्य रसायनांचं प्रमाण वाढवतात. या रसायनांमुळे डोळ्यांची आग होऊन त्यातून सतत पाणी यायला सुरुवात होते. त्यामुळे पोहोतानाही युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा.
– उन्हाचा परिणाम हा फक्त आणि फक्त त्वचेवरच होत नाही, तर डोळ्यांवरही होतो. डोळेही कोरडे होतात. या दिवसात ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्सचा वापर करावा. हे ड्रॉप्स प्रिझर्वेटिव्ह फ्री असले पाहिजेत. या ड्रॉप्सच्या वापरामुळे डोळ्याची जळजळ कमी होते.

चष्म्यासाठी वापरा पोलरॉईड ग्लास
खूप लख्ख प्रकाश सरळ डोळ्यात पडण्यापासून रोखण्यासाठी या काचांचा उपयोग होतो. फोटोक्रोमॅटिक काचांप्रमाणे यांचा उपयोग होतो. शक्‍यतो गॉगल्समध्ये अशा प्रकारच्या काचा प्रसिद्ध आहेत. येथे नमूद केलेल्या गुणधर्माच्या काचा या कुठल्याही नंबरच्या चष्म्यांना सूट होतात. पण वयामुळे ज्यांना चष्मा लागला आहे, त्यांना खूपदा दोन नंबर असलेले चष्मे वापरावे लागतात. वाचनासाठी आणि दूरचे बघण्यासाठी शक्‍यतो दोन वेगवेगळे नंबर लागलेल्या व्यक्ती तुम्ही खूपदा पाहिल्या असतील. याला शक्‍यतो बाय-फोकल काचेचा सल्ला दिला जातो. वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे बायफोकल काचा उपलब्ध आहेत. आता या काचांसाठी “प्रोग्रेसिव्ह ग्लास’ नावाचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. या काचांकडे पाहिले असता कळून येत नाही की या काचेत दोन वेगवेगळे नं. असतील यांची सवय होणे, हे मात्र अत्यंत गरजेचे असते. कुठली पॉवर चष्म्याच्या कुठल्या बाजूस आहे. त्याबरोबर अॅडजस्ट’ करायला खूपदा त्रास होतो. पण एकदा सवय झाल्यानंतर काही अडचणी येत नाही.

चष्म्यांमध्ये कालपरत्वे झालेले हे बदल, आलेली नवनवीन टेक्‍नॉलॉजी’ यामुळे चष्मा हा एखाद्या ऍक्‍सेसरिज’प्रमाणे बनला आहे. त्यामुळे याला नीट समजून घेणं व आपल्या गरजांशी सांगड घालणं ही एक गरज बनली आहे. या लेखाच्या निमित्ताने चष्म्या’ची अधिक चांगली ओळख तुम्हाला होईल आणि तुमचे डोळे उघडून’ तुम्हाला हवा तो चष्मा घेण्यात मदत होईल.

– जयंती महाशब्दे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)