वडूज : नगराध्यक्षा सौ. शोभा माळी यांना निवेदन देताना अभेद सामाजिक संस्थेचे पदाधिकारी.

लेखी खुलाशाची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा
वडूज, दि. 12 (प्रतिनिधी)- हुतात्मा दिनी नगरपंचायत प्रशासनाने कार्यक्रमाचे नियोजन नेटके न केल्याचा लेखी खुलासा नगरपंचायतीच्या प्रशासनाने करावा अशी मागणी अभेद सामाजिक संस्थेने नगराध्यक्षा सौ. शोभा माळी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
देश स्वतंत्र झाल्यापासून 9 सप्टेंबर रोजी शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्मा वीरांना आदरांजली व अभिवादन करण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत व तहसील कार्यालयाच्या मार्फत करण्यात येतो. यावेळी हुतात्मा वीरांच्या कुटुंबातील सदस्य, स्वातंत्र सैनिक, मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नेटके नियोजनाने व राजकारण विरहित केला जात होता. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून स्वातंत्र्य सैनिक व मान्यवर येत असतात. हे हुतात्मा स्मारक देखभाल दुरुस्तीसाठी नगरपंचायतीकडे वर्ग झाल्यानंतर हुतात्मा दिनाचा हा पहिलाच कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमाचे नियोजन करताना निमंत्रण पत्रिका ही कुणाला देण्यात आल्या नाहीत. तसेच अभिवादन करण्यासाठी आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची बैठक व्यवस्था, मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. याबाबत सोमवार, दि.17 पर्यंत लेखी खुलासा न दिल्यास ठिय्या आंदोलन तसेच मुख्याधिकारी यांच्या केबिनला टाळे ठोकण्याचा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी अभेद सामाजिक संस्थेचे डॉ संतोष गोडसे, संजय गांधी चे विजय शिंदे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, पृथ्वीराज गोडसे आदींनी ही मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)