गैरव्यवहार टाळण्यासाठी ग्राहकांना डेबिट, क्रेडिट कार्ड सोयीनुसार बंद करता येणार

मुंबई -देशात वाढत्या डिजिटल व्यवहारांबरोबरच फसवणुकीच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. ग्राहकांकडून नकळत माहिती गोळा करत खात्यातील पैसे चोरी करण्यात येत आहेत. यामुळे ऑनलाइन व्यवहार अथवा एटीएममधून पैसे काढताना गोपनीय माहिती चोरीला जाण्याची भीती होती. मात्र यावर उपाय काढण्यास ऍटम टेक्‍नोलॉजीस आणि टॅनवॉल यांना यश आले असून त्यांनी ई-शिल्ड नावाचे नवीन तंत्रज्ञान सादर केले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना आपले क्रेडिट अथवा डेबिट कार्ड चालू आणि बंद करता येईल.

ग्राहकांना व्यवहार करताना प्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवता येण्याने जोखीम कमी होण्यास मदत होईल. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोन ऍप अथवा एआय आधारित बॉट सेवेचा वापर करून ग्राहकांना ई व्यापार, एटीएम, पीओएस टर्मिनलच्या वापरावेळी कार्ड चालू अथवा बंद करता येणार आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्या व्यवहारांसाठी परवानगी द्यायची अथवा नाकारायची याचा अधिकार राहील. रिअल टाईमने कार्ड आणि खात्यातील रकमेची माहिती गोळा करता येईल.

इंटरनेट सेवा नसणाऱ्या फोनमध्येही या सेवेचा लाभ घेता येईल. बॅंकांना या तंत्रज्ञानाच्या मदतीने घोटाळे कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षेचा खर्च कमी होईल. प्रमुख बॅंकांबरोबर सहयोग करत ही सेवा पुरविण्याचे ऍटमचे उद्दिष्ट आहे. 21 डिसेंबर 2017 पर्यंत कार्ड, इंटरनेट बॅंकिंगवरून 179 कोटी रुपयांचे घोटाळे करण्यात आले होते. 25,800 घोटाळयाच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)