गैरव्यवहाराची चौकशी करा !

मुंबई – एकट्या मंत्रालयात जर तीन लाख 19 हजार 400 उंदीर असतील तर राज्य सरकारच्या राज्यभरातील सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि महामंडळांत किती उंदीर असतील, असे विचारत एकनाथ खडसे यांनी या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली. हे प्रकरण गंभीर असून अशा प्रकरणांमुळे सरकार बदनाम झाले असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

टेंडर प्रक्रियेची सरकार चौकशी करणार मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी टेंडर कोणी काढले याची सरकारलाच माहित नसल्याचे सभागृहात उघड झाले. 2016 साली उंदीर मारण्याचे टेंडर कोणी काढले याची माहीती घेतली जाईल. तसेच आमदार चरण वाघमारे यांनी माहिती अधिकारात घेतलेली ही माहिती खरी समजून टेंडर प्रक्रियेची चौकशी करून त्याचा तपशील सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्वासन सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सभागृहात दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)