गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडगा – पीएमपीएमएल प्रशासनाची कारवाई

पिंपरी – पीएमपीच्या प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक, सुरक्षित व खात्रीशीर सेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून लि. (पीएमपीएमएल) प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवाशांशी अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पीएमपीकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

जुलै महिन्यात गैरवर्तन प्रकरणी 102 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. प्रशासनास प्राप्त झालेल्या गंभीर प्रकरणात 16 कर्मचाऱ्यांवर नो ड्यूटी, नीलंबनाची कारवाई करण्यात आली. 4 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. गंभीर स्वरुपाचा अपहार, गैरहजेरी, प्राणांतिक अपघात निष्काळजीपणा बाबतही कारवाई करण्यात आली आहे. दोन कर्मचाऱ्यांवर वार्षिक वेतन वाढ कमी करण्याची शिक्षा व अन्य प्रकरणी दंडात्मक आर्थिक नुकसान वसुलीची कारवाई करण्यात आली. 1 एप्रिल ते 30 जूनला प्राप्त 104 अहवालांनुसार गंभीर गैरवर्तन स्वरुप लक्षात घेऊन 57 कर्मचाऱ्यांना “नो ड्यूटी’ नीलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पीएमपीएमएलने दिली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)