गेल्या वर्षातील चलनवाढ सहा वर्षांमधील सर्वात कमी

नवी दिल्ली – 2017-18 या आर्थिक वर्षात चलनवाढीचा दर सामान्य राहीला. ग्राहकोपयोगी वस्तूंवर आधारित निर्देशांकाचा दर सरासरी 3.3 टक्के राहीला, गेल्या सहा वर्षांमधील हा सर्वात कमी दर असल्याचे आर्थिक सर्वेक्षण 2017-18 मध्ये नमूद करण्यात आले आहे. गृहनिर्माण, इंधन आणि प्रकाश वगळता इतर जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात प्रामुख्याने घट झाली.

गेल्या चार वर्षांमध्ये चलनवाढीच्या दरात मोठे चढ-उतार दिसून आल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात हा दर बऱ्यापैकी नियंत्रणात आला. केंद्र सरकारने सातत्याने दरवाढीवर लक्ष ठेवल्यामुळे तसेच देशातील चांगल्या कृषी उत्पादनामुळे हा सकारात्मक बदल दिसून आल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले.

-Ads-

मात्र गेल्या काही महिन्यात भाज्या आणि फळांच्या किंमती वाढल्यामुळे अन्नधान्यावर आधारित चलनवाढीच्या दरात वाढ झाल्याचे निरिक्षणाद्वारे नोंदविण्यात आले. 2017-18 या वर्षात देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये चलनवाढीचा दर चार टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहीला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)