गेल्या दहा वर्षांत एकानेही मला डेटसाठी विचारलं नाही – कतरीना

बॉलीवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ ही ‘हुसेन परछम’ या गाण्यामुळे जास्तच चर्चेत आहे. सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत कतरिनाचे नाव आहे. मात्र तरीही गेल्या दहा वर्षांत कोणीही मला डेटसाठी विचारले नाही, असे खुद्द कतरिनाने बोलून दाखवले.

आश्‍चर्य म्हणजे कतरिना वर्षभरापूर्वी रणबीर कपूरला डेट करत होती. ‘अजब प्रेम की गजब’ कहाणीपासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमप्रकरणाला मागच्या वर्षी पूर्णविराम लागला. दुर्दैव म्हणजे त्यानंतर काही महिन्यातच रणबीर कतरिनाची जीवलग मैत्रीण आलियाला डेट करू लागला. या नात्यामुळे कतरिना आलियाच्या मैत्रीत कायमचा दुरावा आला असेही म्हटले गेले. त्याआधी कतरिनाचे नाव सलमानसोबतही जोडलं गेले होते. सलमान कतरिनाशी लग्न करणार अशाही चर्चा होत्या. कतरिनाने कधीच आपल्या लव्ह लाईफ बाबत उघडपणे काहीही वक्‍तव्य केलेले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी तिने रणबीरबाबत एक भावनिक पोस्ट टाकली होती. यातून तिच्या भावनिक आंदोलनाची जाणीव आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसे असले तरी बॉलीवूडमधील आपल्या मैत्रिणी दीपिका आणि प्रियांकाच्या लग्नामध्ये तिने मनसोक्‍त आनंद साजरा केला होता. या दोघींसाठी तिने ख्रिसमसच्या निमित्ताने काही भेटवस्तू द्यायचे ठरवले आहे. रणवीर सिंहला फॅशन डिजायनर मनिष अरोराने डिजाईन केलेले जॅकेट आणि प्रियांकाचा नवरा निक जोनासला एक मस्त शेरवानी भेट द्यायचे तिने ठरवले आहे. तर प्रियांका आणि सोनम कपूर यांना एक प्रायव्हेट जेट भेट द्यावे असे तिने ठरवले आहे. दीपिका पदुकोण आता निर्मितीमध्ये उतरणार आहे. त्यामुळे तिला एक ऑफिस भेट म्हणून द्यावे, असे कॅटला वाटते आहे.

कॅटने आपल्या मित्र मैत्रिणींसाठी सांताक्‍लॉज बनण्याचे ठरवले आहे. मात्र तिला कोण काय भेट देणार हे काही समजू शकलेले नाही. कोणी तरी तिला डेटसाठी विचारले तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद येऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)