गेल्या काही दिवसांत शंभरावर निर्वासितांना जलसमाधी

पॅरीस: लिबीयाच्या किनाऱ्याजवळ युरोपात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या निर्वासितांच्या दोन बोटी या महिन्याच्या सुरूवातीला बुडाल्या. त्यात किमान शंभर जण मरण पावले असल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये किमान 20 बालकांचा समावेश आहे. डॉक्‍टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की 1 सप्टेंबर रोजी निर्वातसितांना घेऊन जाणाऱ्या बोटी लिबीयातून निघाल्या. दोन्ही बोटीत प्रत्येकी 160 जण होते. हे निर्वासित सुदान, माली, नायगर, कॅमेरून, घाना, लिबीया, अल्जिरिया, इजिप्त या देशांचे होते. बोटीची मोटर फेल झाल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे एका बोटीतून वाचलेल्याने सांगितले. दुसऱ्या बोटीला आग लागून ती दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. बाकीच्यांना लिबीयाच्या तटरक्षक दलाने वाचवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)