गेट…सेट..गो हिल मॅरेथॉनचा आज थरार

संग्रहित छायाचित्र

देश विदेशातून रनर्स होणार सहभागी

सातारा- सातारा शहराचे नाव जगाच्या नकाशावर सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा थरार आज रंगणार आहे. स्पर्धेसाठी देश विदेशातून तसेच सातारा जिल्ह्यातील रनर्स स्पर्धेत होणार आहेत. स्पर्धेची जय्यत तयारी पुर्ण झाली आहे तर सगळे रनर्स धावण्यासाठी उत्सुक झाले असून प्रत्येक जण रविवारची पहाट होण्याची आणि अध्यक्षांनी झेंडा फडकावून गेट,सेट ऍण्ड गो म्हणण्याची वाट पहात आहेत.

सातारा रनर्स फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केली जाणारी पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे यंदाचे 7 वे वर्ष आहे. सुरूवातीच्या वर्षात शहरातील डॉक्‍टर्स व उद्योजकांनी एकत्र येत मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात केली. सातारा शहर व परिसराला निसर्गाने दिलेली साथ आणि नेटके नियोजन यामुळे अल्पावधीत देश विदेशातून रनर्स सहभागी होवू लागले. तर यापुर्वीच सातारा हाफ हिल मॅरेथॉनची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. यंदाच्या स्पर्धेची सुरूवात रविवार दि.2 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता तालीम संघ मैदान येथून होणार असून समारोप देखील त्याच ठीकाणी होणार आहे.

स्पर्धेमध्ये देश विदेशातून धावण्यासाठी येणारे रनर्स हे चार दिवसांपुर्वीच सातारा शहरासह परिसरात दाखल झाले आहेत. दरम्यान, स्पर्धेच्या आदल्या दिवशी सर्व रनर्सना किट वाटप करण्यात आले असून आता सर्वजण रविवारची पहाट उजाडण्याची वाट पहात आहेत. स्पर्धेचा प्रारंभ तालीमसंघ येथून झाल्यानंतर पुढे कमानी हौद, देवी चौक मार्गे राजपथ, राजवाडा ते समर्थ मंदिर मार्गे बोगदा, यवतेश्‍वर घाटातून प्रकृती हिल रिसॉर्टमार्गे गणेश खिंडींच्या पठारापर्यंत जाईल. तिथून पुन्हा त्याच मार्गाने परत येवून तालीम संघ मैदान येथे समाप्त होणार आहे.

दरम्यान, स्पर्धेच्या मार्गावर पाणी, औषधे, बिस्कीटे, वेदनाशामक स्प्रे तसेच प्रथमोपचारासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सकाळी 8.30 वाजता तालीमसंघ येथे होणार असून कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधिक्षक, खा.उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारे, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)