गेंडामाळ कब्रस्थानच्या जागेवरील आरक्षण उठवले

मुस्लीम समाज बांधवांकडून आ. शिवेंद्रराजेंचा सत्कार

सातारा  – गेंडामाळ येथे मुस्लीम समाजाची कब्रस्तानाची जागा आहे. याठिकाणी निधन झालेल्या व्यक्‍तींचे दफन केले जाते. या जागेवर नगरपालिकेने बगिचासाठी आरक्षण टाकले होते. हे आरक्षण उठवण्यासाठी मुस्लीम समाजबांधवांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन दिल्यानंतर सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. कब्रस्तानच्या जागेवरील हे आरक्षण नुकतेच उठवण्यात आले असून यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुस्लीम समाज बांधवांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील गेंडामाळावरील मुस्लिमांच्या कब्रस्तानाच्या काही खुल्या जागेवर उद्यानाचे आरक्षण पालिकेने टाकले होते. ते उठवण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी मुस्लीम समाजाबांधवांनी आ. शिवेंद्रराजे यांची भेट घेवून निवेदन दिले होते. एका महिन्यात पडलेले आरक्षण उठवण्यासाठी सहकार्य करु, असे आश्‍वासन त्यांनी दिले व त्यानुसार पाठपुरावा केला. जागेवरील आरक्षण नुकतेच उठवण्यात आले आहे. त्याबद्दल मुस्लीम समाजबांधवांनी आ. शिवेंद्रराजे यांची भेट घेवून सत्कार केला.

यावेळी गेंडामाळ कब्रस्तान ऍक्‍शन कमिटीचे अध्यक्ष आरीफ शेख, इरफान बागवान, मुस्ताक सय्यद, इफ्तेखाब बागवान, युसूफ शेख, अस्मल कुरेशी, माजी नगराध्यक्ष नासिर शेख, दिलावर शेख, महंमदअली बागवान, ऍड. शाहीद शेख, नगसेवक शकील बागवान, मन्सूर बागवान, आसिफ शेख, मुबीन बागवान यांच्यासह चंदन घोडके, विलास कासार, बबलू केंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुस्लीम बांधवांनी कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यावर काही दिवसांत निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन आ. शिवेंद्रराजे यांनी दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)