गॅस सिलेंडरप्रमाणे डिझेलचीही आता ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’

पुणे – गॅस सिलेंडरप्रमाणे डिझेलसुद्धा आता आपल्याला घरपोच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तेल कंपन्यांनी खास वाहन तयार केले आहे. याची सुरूवात पुण्यातून होणार आहे. तेल कंपन्याच्या या उपक्रमाला ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशननेही पाठिंबा दर्शविला आहे.

घरपोच इंधन वितरणाला आम्ही सुरूवातीला विरोध केला. याचे निवेदनही पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांना दिले. त्यानंतर या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. पूर्वी यात किरकोळ स्वरुपातही पेट्रोल-डिझेलची विक्री करण्याचा प्रस्ताव होता. पण, आता किरकोळ ग्राहकांना इंधन मिळणार नसल्याने आम्ही या योजनेचे स्वागत केले आहे. किरकोळ स्वरुपात जर इंधन घरपोच उपलब्ध झाल्यास पंपावर कोणी येणारच नाही, अशी भीती आहे. त्यामुळे विरोध केला होता.
– अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, पेट्रोल-डिझेल असोसिएशन.

पेट्रोल आणि डिझेल लवकरच घरपोच उपलब्ध होण्याचे तेल कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. या उपक्रमात सुरूवातीला फक्त डिझेलची विक्री होणार आहे. या उपक्रमाला तेल कंपन्यांनी “डोअर स्टेप डिलिव्हरी’ असे नाव दिले आहे. यामध्ये पहिल्या टप्यात फक्त जे मोठ्या प्रमाणावर डिझेलची खरेदी करतात, त्यांनाच सेवा पुरविण्यात येणार आहे. आज अनेक कंपन्या अशा आहेत, त्यांना दोन हजार लिटरपेक्षा जास्त डिझेल लागते.

त्यात विशेष करुन इंडियन रेल्वे, बजाज, सॅंडविक, भारत फोर्ज अशा ज्या कंपन्या आहेत, त्यांना कंपनीच्या दारात हे डिझेल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कंपन्यांना पूर्वी एखाद्या पेट्रोल पंपावरुन किंवा कंपनीच्या लोणी काळभोर येथील प्लान्टमधून इंधन घ्यावे लागायचे. आता या कंपन्यांच्या दारात थेट डिझेल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कंपन्यांची सोय होणार आहे.

अशी मिळणार घरपोच सेवा
या सेवेसाठी तेल कंपन्यांनी खास गाडी तयार केली आहे. या गाडीला टॅंकर आणि इंधन मोजण्याचे मशीन जोडण्यात आले आहे. जेथे इंधन पुरवायचे आहे, तेथे जाऊन ही गाडी इंधनाचे वाटप करेल.”फ्युयल ऑन डोअरस्टेप’ असे या उपक्रमाचे नाव आहे. या कंपनीचे दोन कर्मचारी सुद्धा असणार आहेत. डिझेल भरल्यानंतर आपण कार्ड पेमेंटसुद्धा करू शकणार आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)