गॅस सिलेंडरचा काळाबाजार “उजेडात’

पिंपरी – गॅस सिलेंडरचा काळाबाजार करून बेकायदा तसेच धोकादायकरीत्या मोठ्या सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या दुकानाचा छावा संघटनेने पर्दाफाश केला. रहाटणी येथील जनता स्टील सेंटरमध्ये सकाळी साडे आकाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी डिलिव्हरी बॉय सागर साहेबराव गवळी, दुकानातील कर्मचारी दत्ताराम चौधरी याला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्न पुरवठा अधिकारी गणेश सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी मुख्य रस्ता येथील जनता स्टील सेंटर दुकानात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची माहिती छावा संघटनेने सोमवंशी यांना दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पोलीस पथक व छावा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह दुकानात छापा मारला.

त्यावेळी सिलेंडरचा काळाबाजार करून बेकायदेशीरपणे मोठ्या सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरु असल्याचे दिसले. दुकानातून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे 16 सिलेंडर जप्त केले. या प्रकरणी कंपन्यांमधून काळाबाजार करून दुकानांना सिलेंडर पुरवणारा डिलिव्हरी बॉय व दुकानातील एका कामगाराला ताब्यात घेतले आहे. अन्न पुरवठा अधिकारी दिनेश तावरे, एम. एस. ओंबाळे, डी. व्ही. गनविरे, भावना वानखेडे, सुजाता जयभामे, श्रीराम गायकवाड, छावा संघटनेचे युवक अध्यक्ष अमोल वीर, मच्छिंद्र चिंचोले, राम सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)