गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिला गंभीर जखमी

खंदकनाला परिसरातील सागर हॉटेलला लागली आगः दोन अग्निशमन बंबांनी विझविली आग

कोपरगाव – कोपरगाव शहरातील खंदकनाला येथील मेनरोड लगत असलेल्या हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट होऊन त्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि.24) दुपारी साडेबारा वाजता घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेनरोड लगत हुरखॉं बसीरखॉं पठाण यांच्या मालकीचे हॉटेल न्यू सागर आहे. येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील गॅस टाकीचा पाईप चिरल्याने गॅस गळती सुरू झाली. त्यानंतर काहीच क्षणात गॅस टाकीने पेट घेतल्याने तिचा स्फोट झाला. यात हॉटेलमधील कामगार शारदा नंदू मोरे (वय 45, रा. साईबाबा तपोभूमी) ही महिला जखमी झाली.

ही महिला 90 टक्के भाजली आहे. जखमी महिलेस नागरिकांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. कृष्णा फुलसौंदर व डॉ. विजय क्षीरसागर यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लोणी येथे या महिलेस पाठविले.

दरम्यान हॉटेलमध्ये गॅस टाकीच्या स्फोटाने इतर गॅस टाक्‍यांनी पेट घेतल्याने संपूर्ण हॉटेल पेट घेतला. हॉटेलमध्ये आणखी टाक्‍या असल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ सुरू झाली. कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी काही वेळात घटनास्थळी दाखळ झाली. त्यानंतर काही वेळात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाची गाडी आली. या दोन्ही बंबांनी आग आटोक्‍यात आणली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

नगरपालिका अग्निशामक दलाचे प्रमुख संभाजी कार्ले, चंद्रकांत साठे, रघू राक्षे, श्‍याम ननवरे, चालक ए. ई. शेख यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, तर त्यांना खंदकनाला मित्र मंडळाचे संतोष शेलार, गणेश आदमाने, बाळासाहेब धोकडे यांच्यासह तरुणांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)