पिंपरी – गॅस टॅंकरचा अपघात, प्रसंगावधनाने अनर्थ टळला

तळेगाव दाभाडे – उरण (मुंबई) येथून वडूज (सातारा) येथे निघालेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरला अज्ञात कंटेनरने धडक दिलेल्या अपघात झाला. यावेळी टॅंकर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात गुरुवार (दि.21) पहाटे 4:30 वा. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से (ता.मावळ) हद्दीत घडला.

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस टॅंकर (एम एच 11 ए एल 1822) चालक अविनाश वाल्मिक जगदाळे (वय 39, रा. वडूज जि. सातारा) हे उरण, मुंबई येथून पाच टन एलपीजी गॅस घेऊन वडूज, साताराकडे निघाले होते. गॅस टॅंकरला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे (ता.मावळ) हद्दीत अज्ञात कंटेनरने धडक दिली. या धडकेने टॅंकरच्या चालक केबिनचे खूप नुकसान झाले. टॅंकरमध्ये गॅस असून मोठा अनर्थ होऊ शकतो याची जाण असलेल्या चालकाने त्या अवस्थेतही प्रसंगावधान दाखवत अपघातानंतर आवश्‍यक ती सर्व पाऊले उचलली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)