गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत पाच जखमी

पिंपरी – कासारवाडी येथील एका घराला गॅस गळतीमुळे सोमवारी (दि. 31) भीषण आग लागली. यामध्ये कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून त्यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार कासारवाडीत केशव नगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही घटना घडली. शोभा बिरादार (वय-30), गणेश बिरादार (वय-8), शुभम बिरादार (वय-5), देवांश बिरादार (वय-3), विजय जाधव (वय-22) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिरादार यांच्या किचनमधील सिलेंडर लिकेज होत होता. रविवारी रात्रभर यातून गॅस लिकेज होत राहिला. सकाळी आठच्या सुमारास शोभा बिरादार किचनमध्ये काम करण्यासाठी गेल्या असताना गॅस सुरु केला आणि किचनमध्ये लिकेज झालेल्या गॅसचा भडका झाला. संत तुकाराम नगर आणि भोसरी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)