गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक

पुणे – दिव्यांग कोट्यातून एच.पी. गॅसची एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची 27 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तीन पुरुष व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आनंद कळके (40, रा. धनकवडी) यांना आरोपींनी दिव्यांग कोट्यातून धनकवडी भागासाठी एच.पी. गॅसची एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.

यासाठी 35 लाख रुपये खर्च असून कमीशनपोटी 1 लाख 25 हजार द्यावे लागतील असे सांगण्यात आले. यानंतर फिर्यादीला वेगवेगळी कारणे सांगत डिसेंबर 2013 ते एप्रिल 2015 या कालावधीत रोख 26 लाख 50 हजार रुपये व बॅंक खात्यावर 50 हजार रुपये वर्ग करून असे एकूण 27 लाख रुपये घेण्यात आले. यानंतर त्यांना गॅस एजन्सी न देता पेट्रोलियम मंत्रालय (दिल्ली) यांच्याकडील खोट्या कागदपत्रांची झेरॉक्‍स प्रत व खोट्या मेलची प्रत देवून दिशाभूल करण्यात आली. कळके यांची जेसीबी मशीन भाड्याने पुरवण्याचा व्यवसाय आहे; तर यातील एक आरोपी अमर सिंग याचाही जेसीबी माशीन भाड्याने पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्याने चार वर्षांपूर्वी कळके यांची एका महिलेशी ओळख करून दिली होती. तिने त्यांना मंत्रालयात ओळख असल्याचे सांगितले होते. एजन्सी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्हि. बी. कोळी तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)