गॅस एजन्सीचे अतिक्रमण हटवणार

file pic

निमगावासावा प्रशासनाला जुन्नर पंचायतीचा आदेश

बेल्हे- गॅस एजन्सीच्या इमारतीचे अतिक्रमण हटवून त्या एजन्सीचा परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा आदेश निमगावसावा (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत प्रशासनाला जुन्नर पंचायत समितीने दिल्याने ऐन दीपावलीच्या काळात परिसरात खळबळ उडाली.
निमगावसावा येथे सरकारी गायरान जमिनीत अनेक अतिक्रमणे आहेत. त्या जमिनीत उभारण्यात आलेल्या इमारतीत निमगावसावा ग्रामपंचायत प्रशासनाने गॅस व्यवसायासाठी दिलेल्या ना हरकत दाखल्यामुळे एच. पी. कंपनीने अनिता गोरक्षनाथ गाजवे यांना गॅस एजन्सीचा अधिकृत परवाना दिला आहे.
निमगावसावा येथे शासकीय गायरान जमिनीत धनाढ्यानी अतिक्रमणे करून इमारती उभ्या करून जागा बळकावली असल्याची बाब येथील सामाजिक कार्यकर्ते अजित नानाभाऊ गाडगे यांनी 2015 मध्ये उघडकीस आणून ती अतिक्रमणे हटविण्यात यावीत, यासाठी जुन्नर पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे पाठपुरावा केला.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर निमगावसावा येथील अतिक्रमित जमिनीची मोजणी करण्यात आली. या सरकारी गायरान जमीनीवर अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जुन्नर पंचायत समितीने 23 ऑगस्ट 2018 ला निमगावसावा ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेला ना हरकत दाखला रद्द करून संबंधित गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्यासाठी एचपी गॅस कंपनीला पाठपुरावा करावा, असा आदेश देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)