इंग्लंडमध्ये पेन्सफोर्ड येथे राहणाऱ्या बापलेकांनी मिळून आपल्या गॅरेजची जमीन चक्क नाण्यांनी सजवली आहे. डोमनिक आणि त्यांचा मुलगा जॉन यांनी दोन पेन्सच्या नाण्यांनी ही जमीन मढवली आहे. त्यामुळे आता त्यांचे गॅरेज केवळ इंग्लंडमध्येच नव्हे तर जगभर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. आपल्या गॅरेजची जमीन मोझॅक डिझाईनने सजवण्याचे या दोघांनी ठरवले होते. त्यासाठी त्यांनी चक्क नाण्यांचा वापर करण्याचे ठरवले. मागे एकदा एका माणसाने आपल्या दुकानाची जमीनही अशीच नाण्यांनी मढवली होती.

आता या दोघांनी दोन पेन्सची सुमारे 33,700 नाणी गोळा करून हे काम सुरू केले. ते बहुतांशी पूर्ण झाले असले तरी अद्याप काही काम बाकी आहे. त्यांनी दिवसाचे अनेक तास या कामात घालवले आहेत. आतापर्यंत सुमारे 17 हजार नाणी जमिनीवर चिकटवून झालेली आहेत. त्यापूर्वी त्यांना शीतपेयांमध्ये बुडवून, स्वच्छ करून चमकवण्यात आले. या नाण्यांवर एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या महाराणीची प्रतिमा असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)