गॅजेट रीव्ह्यु : बोट रॉकर्ज 400 ऑन इअर ब्लूटूथ हेडफोन्स

हेडफोन्स ही आजकालच्या जीवनशैलीची ही एक प्रमुख गरज बनली आहे, खास करून तरुणाई मध्ये या गॅजेटची “भन्नाट क्रेझ’ आहे, हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुला-मुलींची तर ही मस्ट-हॅव अक्‍सेसरी असून फोन वर बोलण्यापासून ते गाणी ऐकण्या पर्यंतची सर्व कामे या “हेडफोन’ मुळेच “इतरांना’ आपल्या आवाजाचा त्रास न होता पार पडू शकतात यामुळेच दिसायला “लहान’ परंतु “कीर्ती’ महान अशीच काही ख्याती हेडफोन्सची आहे. आजच्या गॅजेट रीव्ह्युव मध्ये आपण जाणून घेणार आहोत बोट रॉकर्ज 400 ऑन इअर ब्लूटुथ हेडफोन्स बाबत. पाहूयात बोट चा हा 1300 रुपये किमतीचा ब्लूटूथ हेडफोन कसा परफोर्म करतोय ते…

का घ्यावा?
सॉफ्ट कुशन मुळे वापरण्यास आरामदायक आहे.
आवाजाची क्‍लीऍरिटी उत्तम
ऑन इयर डिझाईन
वायरलेस असल्याने केबल्स ची झंझट नाही
 

का घेऊ नये?
जर तुम्हाला तासनतास गप्पा मारण्यासाठी हेडफोन ची गरज आहे तर हा हेडफोन कॉल वर बोलताना रेगुलर माईक असणाऱ्या वायर्ड हेडफोन्स एवढी क्‍लीऍरिटी देऊ शकणार नाही.

डिझाईन :बोट रॉकर्ज 400 ऑन इअर ब्लूटुथ हेडफोन हा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे परंतु रंगसंगतीनुसार या हेडफोनच्या किमतीदेखील कमीजास्त आहेत. या मधील कार्बन ब्ल्याक (1299) या रंगातील हेडफोन सर्वात स्वस्त आहे तर रेड कलर(1644) सर्वात महागडा आहे. हेडफोनच्या उजव्या बाजूच्या ‘ड्राइव्ह’ वर नोटिफिकेशन साठी ब्लूरेड एल.ई.डी. लाईट, 3.5 एम.एम. चा ऑडीओ जॅक, चार्जिंग साठी यु.एस.बी. पोर्ट, व आवाज कमी-जास्त करण्यासाठी तसेच गाणे बदलण्यासाठी “बटन’ देण्यात आली आहेत. दोन्ही ड्राइव्ह्स कानांना आरामदायक असाव्यात म्हणून त्यावर फोमचे कुशन देण्यात आले आहे तसचे वरच्या बाजूस असणाऱ्या प्लॅस्टिक पट्टीला देखील आतील बाजूने फोमचे कोटिंग दिले आहे जेणेकरून हेडफोन जास्त वेळ परिधान करणे त्रासदायक होऊ नये यासाठी फोमचे कोटिंग दिले गेले आहे. हेडफोन चे वजन 109 गरम एवढे आहे.

-Ads-

परफोर्मन्स :10 मिटर पर्यंत वायरलेसची रेंज असणारा बोट चा हा हेडफोन परफोर्मन्स च्या बाबतीत प्रभात गॅजेट रीव्ह्युव टीमला एक चांगला परफोर्मर म्हणून आढळला. बोट च्या अन्य हेडफोन्स प्रमाणेच हा हेडफोन देखील आवाजाची उत्कृष्ट “क्‍लीऍरिटी’ देतो. बास व ट्रीबल साउंड देखील चांगल्या पद्धतीने वाजत असून आवाज संपूर्ण वाढवल्यानंतर देखील फाटल्यासारखा न येत क्‍लीअर येतो. टीमने हा हेडफोन गाडी चालवताना “टेस्ट’ केला असता आवाज दोन तीन वेळा कट झाल्याचे आढळले;

मात्र फोन वरच्या खिशात अथवा मागच्या खिशात ठेवल्यानंतर हा प्रॉब्लेम दूर झाला. या मध्ये असणारी बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी 2 ते 2.30 तासांचा वेळ घेत असून एकदा चार्ज झाल्यानंतर तुम्ही हा हेडफोन संपूर्ण दिवस वापरू शकता. चार्जिंग नसल्यास यामध्ये 2.5 एम.एम च्या ऑडीओ जॅकचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. यासाठी कंपनीकडून ऑक्‍स केबलदेखील देण्यात आली आहे. पॅसिव्ह नॉईस कॅन्सेलेषन दिले गेले असून फोन वर बोलण्यासाठी इनबिल्ट माईक देण्यात आला असला तरी फोन वर बोलताना आवाजात खरखर जाणवत असल्याचे अढळले आहे. एकंदरीतच बोटचा बोट रॉकर्ज 400 ऑन इअर ब्लूटुथ हेडफोन 1300 रुपये किमतीच्या टॅगसोबत ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आहे.

– प्रशांत शिंदे 

 

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)