गृहविभागाकडे पीएमपीची थकबाकी

मोफत प्रवासापोटीचे 10 कोटी देण्याचा विसर

– गणेश राख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – कर्तव्यार्थ पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवासापोटीची थकीत रक्‍कम देण्याचा गृहविभागाला विसर पडला आहे. मागील तीन वर्षांपासून पीएमपीला ही रक्‍कम देण्यात आलेली नाही. परिणामी आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या प्रशासनाला जमाखर्चाचे गणित जूळविणे कठीण जात आहे.

महापालिका परिवहन सेवेच्या (पीएमपी) बसगाड्यांमधून कर्तव्यार्थ पोलीस कर्मचारी मोफत प्रवास करतात. या प्रवास खर्चापोटी राज्य सरकारच्या गृहविभागाकडून अनुदान दिले जाते. मात्र, परिवहन सेवेचे हे अनुदान गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. थकीत अनुदानाच्या रकमेपैकी पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी एकदा 15 कोटी 36 लाख 60 हजार रुपये पीएमपीला दिले होते. त्यानंतर ही रक्‍कम देण्यात आलेली नाही. यामुळे सद्यस्थितीत ही रक्‍कम 10 कोटी 3 लाख 34 हजारांवर गेली आहे. रक्‍कम मिळावी यासाठी प्रशासनाकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, तरीही ही रक्‍कम जमा झालेली नाही. यामुळे अगोदरच आर्थिक कोंडीत सापडलेल्या पीएमपीचा भार वाढत आहे. यातच इंधनपुरवठा करणाऱ्या कंपन्या पीएमपीकडे पैशांची मागणी करत आहेत. मात्र, दुसरीकडे पीएमपीला येणे असलेली रक्‍कम वेळेत मिळत नसल्याने प्रशासन आर्थिक कोंडीत सापडत असल्याचे दिसून येत आहे.

2015-16 : 3 कोटी 33 लाख 13 हजार 262


2016-17 : 3 कोटी 35 लाख 10 हजार 504


2017-18 : 3 कोटी 35 लाख 10 हजार 504

…वर्षात तीन स्मरणपत्रे
पीएमपीची थकीत रक्‍कम वाढत चालली असून ती जमा करावी यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वर्षभरात 26 फेब्रुवारी, 12 ऑक्‍टोबर आणि नुकतेच 26 नोव्हेंबर 2018 रोजी पीएमपीकडून पोलीस आयुक्त कार्यालयाला पत्रव्यवहारव्दारे रक्‍कम जमा करण्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही रक्‍कम जाम करण्यात आली नाही.

थकीत रक्‍कम मिळावी यासाठी प्रशासनाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यासाठीचा पाठपुरावा सुरू असून लवकरच पीएमपी प्रशासनाला ही रक्‍कम उपलब्ध होईल.

– नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)