गृहपाठ न केल्याने विद्यार्थ्याला मारहाण

पिंपरी – गृहपाठ केला नसल्याच्या कारणावरून एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. हा प्रकार जुनी सांगवीमधील नृसिंह हायस्कूलमध्ये शुक्रवारी (दि.23) घडला. मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे वडील गोपाळ पटवाणा (वय-35, रा. कवडे नगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलिसांत फिर्याद दिली आहे. रसाळ अशी गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपाळ पटवाणा यांचा मुलगा मयांक पटवाना (वय-12) हा जुनी सांगवी येथील नृसिंह हायस्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिकतो. शुक्रवारी मयांकने गृहपाठ केला नाही, या कारणामुळे शिक्षकाने मयांकला हाताने पाठीत बेदम मारले. याबाबत मयांकने घरी सांगितले नाही. शनिवारी सकाळी मयांकच्या आईच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर मयांकच्या वडिलांनी सांगवी पोलिसात शिक्षकाविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)